सन २०११ चे जनगणनेनुसार कोल्हापूर शहराची लोकसंख्या ही ५,४९,२३६ इतकी आहे
कोल्हापूर शहराची हद्द
१. उत्तरेस पंचगंगा नदी
२. पूर्वेस निगदेवडी, उचगाव, उजळाईवाडी, इ. गावे
३. दक्षिणेस वाडीपिर, कळंबा, मोरेवाडी, इ. गावे
४. पश्चिमेस शिंगणापूर, इ. गावे
कोल्हापूर शहरात महाराष्ट्र राज्य विधानसभेचे २ मतदारसंघ आहेत.
|
१. कोल्हापूर (उत्तर) |
२. कोल्हापूर (दक्षिण) |
कोल्हापूर महानगरपालिकेबद्दल
कोल्हापूर नगरपालिकेची स्थापना दि. १२ ऑक्टोबर १८५४ रोजी झाली. मार्च १९४१ मध्ये स्थानिक स्वराज्य संघ ही संस्था स्थापन करणेत आली. डिसेंबर १९७२ मध्ये नगरपरिषदेचे रुपांतर महानगरपालिकेत झाले. ऑगस्ट १९७८ मध्ये खऱ्या अर्थाने पहिली लोकनियुक्त महानगरपालिका अस्तित्वात आली.
सन १९२९ ला कोल्हापूर म्युनिसिपालिटीच्या इमारतीचा पूर्व, दक्षिण व उत्तरचा भाग बांधणेत आला. त्यानंतर १९९३ साली पश्चिमेकडील भाग बांधल्याने इमारतीला चौकोनी आकार मिळाला. आयताकृती असलेली ही इमारत काळ्या घडीव दगडामध्ये बांधलेली असून तिला दोन मजले आहेत. छोटासा तिसरा मजला प्रत्येक बाजूच्या मध्यावर बांधलेला आहे. पहिल्या मजल्यावर नवीन व जुना असे दोन दिवाणखाने आहेत. त्याचा उपयोग महानगरपालिकेच्या सभांसाठी करण्यात येतो.
सध्या कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रात एकूण २० प्रभाग असून प्रभाग क्र. १ ते १९ मध्ये प्रत्येकी ४ नगरसेवक व प्रभाग क्र. २० मध्ये ५ नगरसेवक याप्रमाणे एकूण ८१ नगरसेवक सभागृहात निवडून येत असतात. तसेच ८ स्वीकृत नगरसेवक सभागृहात असतात.
कोल्हापूर महानगरपालिकेचे प्रमुख म्हणून आयुक्त तथा प्रशासक यांची जबाबदारी असते. महानगरपालिका आयुक्त हे भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) अधिकारी असतात. कोल्हापूर महानगरपालिकेचे स्थापनेपासून आजपर्यंत एकूण ३३ आयुक्त महानगरपालिकेस लाभले आहेत. शासनाकडून कोल्हापूर महानगरपालिकेत येणारे अति. आयुक्त, उप-आयुक्त, सहा. आयुक्त, इ. अधिकारी हे विविध विभागांचे नियंत्रण अधिकारी म्हणून कार्यरत असतात. विविध विभागांचा आढावा घेणे, विभागांचे मुद्दे, इ. आयुक्त यांचेकडे मांडण्याचे काम सदर अधिकारी करतात.
कोल्हापूर महानगरपालिका वॉर्ड
प्रभाग क्र १ |
प्रभाग क्र २ |
प्रभाग क्र ३ |
प्रभाग क्र ४ |
प्रभाग क्र ५ |
प्रभाग क्र ६ |
प्रभाग क्र ७ |
प्रभाग क्र ८ |
प्रभाग क्र ९ |
प्रभाग क्र १० |
प्रभाग क्र ११ |
प्रभाग क्र १२ |
प्रभाग क्र १३ |
प्रभाग क्र १४ |
प्रभाग क्र १५ |
प्रभाग क्र १६ |
प्रभाग क्र १७ |
प्रभाग क्र १८ |
प्रभाग क्र १९ |
प्रभाग क्र २० |
प्रशासकीय कामकाजाचे सोयीसाठी कोल्हापूर महानगर पालिका क्षेत्रात ४ विभागीय कार्यालयांची निर्मिती करण्यात आली आहे.
१. विभागीय कार्यालय क्र. १, गांधी मैदान |
२. विभागीय कार्यालय क्र. २, छ. शिवाजी मार्केट |
३. विभागीय कार्यालय क्र. ३, राजारामपुरी |
४. विभागीय कार्यालय क्र. १, कावळा नाका |
कोल्हापूर महानगरपालिके अंतर्गत रुग्णालये
१. सावित्रीबाई फुले रुग्णालय |
२. पंचगंगा रुग्णालय |
३. आयसोलेशन रुग्णालय |
कोल्हापूर महानगरपालिके अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रे
१. प्राथमिक आरोग्य केंद्र, सावित्रीबाई फुले रुग्णालय |
२. प्राथमिक आरोग्य केंद्र,फिरंगाई |
३. प्राथमिक आरोग्य केंद्र, राजारामपुरी |
४. प्राथमिक आरोग्य केंद्र, पंचगंगा |
५. प्राथमिक आरोग्य केंद्र, कसबा बावडा |
६. प्राथमिक आरोग्य केंद्र, महाडीक माळ |
७. प्राथमिक आरोग्य केंद्र, आयसोलेशन रुग्णालय |
८. प्राथमिक आरोग्य केंद्र, फुलेवाडी |
९. प्राथमिक आरोग्य केंद्र, सदर बाजार |
१०. प्राथमिक आरोग्य केंद्र, सिद्धार्थ नगर |
११. प्राथमिक आरोग्य केंद्र, मोरे-मानेनगर |