मुख्यपृष्ठ
  • आपल्यास घरफाळा भरणा करणेसाठी आपले जवळील नागरी सुविधा केंद्रात भेट देता येईल. किंवा कोमनपा वेब पोर्टल https://web.kolhapurcorporation.gov.in द्वारे देखील आपण घरफाळा भरणा करून शकता.
  • कोल्हापुर महानगरपालिके अंतर्गत विविध विभागीय कार्यालयांमध्ये नागरी सुविधा केंद्रे सुरु आहेत.

    १. नागरी सुविधा केंद्र, वि. का. १, गांधी मैदान

    २. नागरी सुविधा केंद्र, वि. का. २, छत्रपती शिवाजी महाराज मार्केट

    ३. नागरी सुविधा केंद्र, वि. का. ३, राजारामपुरी

    ४. नागरी सुविधा केंद्र, वि. का. ४, ताराराणी मार्केट

    ५. नागरी सुविधा केंद्र, कोमनपा मुख्य इमारत

    ६. नागरी सुविधा केंद्र, कसबा बावडा

    वरीलपैकी आपले जवळच्या कोणत्याही सुविधा केंद्रास आपण भेट देऊन तेथे आपण घरफाळा, पाणीपट्टी, परवाना फी, इस्टेट फी, इ. भरणा करून शकता.

  • आपण घरफाळा, पाणी पट्टी भरणा करणेसाठी कोमनपा वेब पोर्टल https://web.kolhapurcorporation.gov.in किंवा मोबाईल ॲपद्वारे आपण घरफाळा, पाणीपट्टी भरणा करू शकता. त्यासाठी आपणास संकेतस्थळ किंवा मोबाईल अॅपवर नोंदणी करून लॉगिन करावे लागेल. त्यानंतर आपण योग्य पर्याय निवडून आपले घरफाळा किंवा पाणीपट्टीचे देयक भरणा करून शकता.
  • कोल्हापुर महानगरपालिकेचे संकेतस्थळ https://web.kolhapurcorporation.gov.in वरील टेंडर या मेनूवर क्लिक केलेनंतर महानगरपालिकेअंतर्गत विविध विभागांकडून सुरु असलेले कोटेशन अथवा टेंडर प्रक्रीयेबाबत आपल्यास माहिती उपलब्ध होईल.

  • कोल्हापुर महानगरपालिकेचे संकेतस्थळवर संपर्क या मेनूला क्लिक केलेनंतर महानगरपालिकेतील विविध अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांकाची माहिती आपल्यास उपलब्ध होईल.
  • कोल्हापूर महानगरपालिका संकेतस्थळ किंवा मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन पेमेंट सुविधाद्वारे कर भरणा करताना काही अडचण येत असल्यास ०२३१-२५४१३८८ या क्रमांकावर संपर्क करावा अथवा softwaresupportkmc@monarchtechnologies.com वर आपले देयकाबद्दल माहिती ईमेल करावी. त्यानुसार आपले तक्रारीचे तात्काळ निवारण करण्यात येईल.
  • गुगल पे, फोन पे, किंवा इतर कोणत्याही युपीआय ॲपवरून सध्या पाणीपट्टी व घरफाळा भरण्याची सुविधा उपलब्ध करून देणेत आली आहे.
    1. Visit the official website of Kolhapur Municipal Corporation for information of various departments.

    2. In the 'Departments' menu, on the website, you can get the information of various departments under Kolhapur Municipal Corporation.

  • कोल्हापुर महानगरपालिकेचे संकेतस्थळ https://www.kolhapurcorporation.gov.in वरील नागरी सुविधा या मेनूवर क्लिक करा. त्यानंतर नवीन नागरिक नोंदणी या बटनावर क्लिक करा. दिसणाऱ्या स्क्रीनवर आपली आवश्यक वैयक्तिक माहिती भरून आपण संकेतस्थळावर नोंदणी करू शकता.
  • टप्पे -

    1. कोल्हापूर महानगरपालिकेचे अधिकृत संकेतस्थळ www.kolhapurcorporation.gov.in ला भेट द्या.

    2. संकेतस्थळावरील नागरी ऑनलाइन सेवा या मेनूवर क्लिक करा.

    3. संकेतस्थळावर आपल्या खात्यात प्रवेश करण्यासाठी लॉगिन बटणावर क्लिक करा.

    4. लॉगिन करण्यासाठी तुमचा नोंदणीकृत ईमेल किंवा मोबाईल आणि पासवर्ड एंटर करा.

    5. यशस्वी लॉगिन केल्यानंतर तुम्हाला होम पेज दिसेल.

    6. सदर स्क्रीनवरील तक्रार नोंदणी बटणवर क्लिक करा. तुम्हाला तुमच्या खात्यामधील तक्रारीचा डॅशबोर्ड दिसेल.

    7. तक्रार नोंदवण्यासाठी नवीन तक्रार वर क्लिक करून तक्रार नोंदणीसाठीआवश्यक असलेले सर्व तपशील प्रविष्ट करा.

    8. 'सेव्ह' बटणावर क्लिक करा. तुम्हाला स्क्रीनवर टोकन नंबर मिळेल. तसेच तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर तक्रारीबाबत एक एसएमएस प्राप्त होईल. तुमच्या तक्रारीची स्थिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा टोकन नंबर वापरू शकता.

    • कोमनपा संकेतस्थळावरील नागरी ऑनलाइन सेवा या मेनूवर क्लिक करा. 
    • त्यानंतर तक्रार स्थिती या बटनवर क्लिक करा.
    • Complaint Status नावाची स्क्रीन ओपन होईल.
    • आपल्या तक्रारीचा टोकन क्र. टाईप करा.
    • चेक स्टेट्स बटनवर क्लिक करा. आपल्या तक्रारीची सध्यस्थितीची माहिती आपणास दिसेल
  • कोल्हापूर महानगरपालिकेचे संकेतस्थळावर नागरी ऑनलाइन सेवा या मेनूवर क्लिक करावे. एक नवीन स्क्रीन सुरु होईल. त्यावर विविध टॅब उपलब्ध असून मिळकत कर या टॅबला क्लिक करावे. त्यानंतर दिसणाऱ्या स्क्रीनवर आपला करदाता क्रमांक टाकावा. त्यानंतर Search बटनवर क्लिक करावे. आपले मिळकतीची कराची सर्व थकबाकी आपणास स्क्रीनवर उपलब्ध होईल.
  • कोल्हापूर महानगरपालिकेचे संकेतस्थळावर नागरी ऑनलाइन सेवा या मेनूवर क्लिक करावे. एक नवीन स्क्रीन सुरु होईल. त्यावर विविध टॅब उपलब्ध असून पाणी कर या टॅबला क्लिक करावे. त्यानंतर दिसणाऱ्या स्क्रीनवर आपला नळ जोडणी क्रमांक टाकावा. त्यानंतर Search बटनवर क्लिक करावे. आपले नळ जोडणीची कराची सर्व थकबाकी आपणास स्क्रीनवर उपलब्ध होईल.
  • कोल्हापूर महानगरपालिकेचे संकेतस्थळावर प्रकाशने या मेनू मध्ये कोल्हापूर महानगरपालिके अंतर्गत सर्वसाधारण सभा, स्थायी सभा, इ. बैठकांचे इतिवृत्त तसेच इतर माहिती उपलब्ध करून देणेत आली आहे. आपल्या आवश्यकतेनुसार प्रकाशने मेनूमधील योग्य त्या सबमेनूमधून आपणास आवश्यक सर्व माहिती उपलब्ध होईल.
  • कोल्हापूर महानगरपालिकेचे संकेतस्थळावर प्रकाशने या मेनूमध्ये केलेल्या कामाचा तपशील या सबमेनूमध्ये महानगरपालिके अंतर्गत विविध विभागीय कार्यालयांद्वारे सुरु असलेले विकास कामांची माहिती तसेच त्यांची सध्यस्थितीची माहिती उपलब्ध करून देणेत आली आहे. आपल्या आवश्यकतेनुसार आर्थिक वर्ष, विभागीय कार्यालय, विभागाचे नाव, निवडून आपण विकासकामांची माहिती पाहू शकता.
  • कोल्हापूर महानगरपालिकेचे संकेतस्थळावर भरती पृष्ठ या मेनू वर क्लिक केल्यानंतर एक स्क्रीन दिसेल. सदर स्क्रीनवर महानगरपालिकेअंतर्गत सुरु असलेल्या विविध भरती प्रक्रियाबाबत जाहीर सूचना वेळोवेळी प्रसिद्ध करणेत येत असतात. त्यामुळे महानगरपालिके अंतर्गत सुरु असलेल्या विविध भरती प्रक्रियांची माहितीसाठी नियमितपणे संकेतस्थळावर भेट देऊन खात्री करता येईल.
  • कोल्हापूर महानगरपालिकेचे मोबाईल ॲप myKMC हे महानगरपालिका संकेतस्थळ तसेच गुगल प्लेस्टोअरवर उपलब्ध आहे.
  • कोल्हापूर महानगरपालिकेचे संकेतस्थळावर जाऊन नागरी ऑनलाइन सेवा या मेनूवर क्लिक करा. त्यानंतर कोमनपा पोर्टलवर लॉगिन करा. लॉगिन केलेनंतर विवाह नोंदणी प्रमाणपत्र या बटनवर क्लिक करा. त्यानंतर एक येणाऱ्या फॉर्मवर आपली सर्व माहिती भरून आवश्यक कागदपत्रे जोडा.