नागरिक सेवा
घरफाळा विभाग

:

:

:

:

कोल्हापूर महानगरपालिका शहर हद्दिमधील मिळकतीवर कराची आकारणी करून वसूली करण्याची कार्यवाही या विभागाकडून करण्यात येते. कोल्हापूर शहराची विभागणी ए,बी,सी,ङी व इ अशा पाच वॉ्र्डसमध्ये केली आहे.

 

नागरिक व कार्यलयीन कामकाजाच्या सोयीस्तव कर आकारणी व वसुली विभागाचे चार प्रशासकीय कार्यलयात विभागणी करण्यात आली आहे. ए,बी,वॉर्ड वसुली कार्यलय हे वि. का. १,.गांधी मैदान येथे, सी,ङी वॉर्ड वसुली कार्यालय हे वि. का. २, छत्रपती शिवाजी महाराज मार्केट इमारत येथे कार्यरत असून इ वॉ्र्ड मधील वसुली कार्यलय, वि.का. ३ राजारामपुरी व वि. का. ४, ताराराणी मार्केट,कावळा नाका येथे कार्यरत आहेत.

 

  • कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्व:उत्पन्नाचा मोठा वाटा घरफाळयाचा (प्रॉपर्टी टॅक्स) आहे.
  • सन 2011 पूर्वी कोल्हापूर महापालिकेमध्ये करपात्र मुल्यानुसार (रेटेबल व्हॅल्यु) कराची आकारणी करण्यात येत होती.
  • 01 एप्रिल 2011 पासून कोल्हापूर महापालिकेने भांडवली मुल्यावर आधारीत कर आकारणीची पध्दत सुरू केली आहे.
  • जानेवारी 2011 चा रेडीनेकनर दरावर भांडवली मुल्य निश्चित करून कर आकारणी करण्यात येत आहे.
  • 01 एप्रिल 2019 पासून भाडे कराराने होणारी कर आकारणीची पध्दत रद्द करणेत येवून भाडेने दिलेल्या मिळकतींचे भांडवली मुल्य निश्चित करण्यासाठी  वापर भारांक 5 वापरून आकारणी करण्यात येत आहे.
  • सन 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये कोल्हापूर शहर हद्दीमध्ये एकुण 1,58,000 इतक्या मिळकती असून सदर मिळकतींची देयके तयार करून वितरीत करण्यात आली आहेत.
  • दि.07 जून 2023 पासून शहरातील मिळकतींचा रिव्हीजन सर्व्हे सुरू करणेत आला आहे. याकामी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होणे आवश्यक आहे.
  • कोल्हापूर महापालिकेस बँक ऑफ महाराष्ट्र यांचेमार्फत असेंटेक टेक्नॉलॉजी प्रा.लि. यांची कर आकारणी विभागाची संपूर्ण सॉफ्टवेअर प्रणाली विकसित करण्याकरीता नेमणूक करणेत आली आहे. असेंटेक यांचेकडून नवीन संगणक प्रणालीचे कामकाज सुरू आहे. सदरचे काम पूर्ण झालेनंतर डेटा मायग्रेशन व व्हॅलिडेशन करीता देणेत येणार आहे. त्यानंतर नवीन संगणकीय प्रणाली गो-लाइव्ह करण्यात येईल.

 

 

मुंबई प्रातिक महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कराधान प्रकरण ११, कलम १२९ मध्ये महानगरपालिकेला बसविण्यात येण्याजोगे मालमत्ता कर कोणत्या दराने व यामध्ये कोणते कर अंतर्भूत होतात,याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहेत. त्यानुसार मालमत्ता करामध्ये अंतर्भूत असणारे कर व ते कोणत्या मर्यादेच्या व शर्तीच्या अधीन राहून शहरातील इमारती व जमिनीवर बसविण्यात येतील याचे नियम केले असून या करांच्या दरांच्या वैधानिक तरतूदी व प्रचलित कराचे दर यांचा तक्ता खालीलप्रमाणेः


 

करपा़ञ मूल्य निश्चित करण्याचे दर खालीलप्रमाणेः

 

 

अ.क्र.

कराचे नाव

नियमातील तरतुदीप्रमाणे आकारण्यात येणारे दर

सध्या बसविलेले दर

 

 

 

 

निवासी

अनिवासी

 

 

किमान

कमाल

किमान

कमाल

किमान

कमाल

१.

सामान्य कर

कलम १२९ क १२ व पुढे

 

१५%

३६%

१९.५%

४२%

२.

साफसफाई

कलम १२९ ब,

मर्यादा नाही

६.५%

१०.५%

१४%

१५%

३.

विशेष सफाई कर

कलम १३७,किमान कमाल बंधन नाही

-

-

-

३०%

-

४.

जललाभ कर

कलम १२९(अ)(अ) ६टक्के किमान,कमाल बंधन नाही

६%

३%

-

३%

-

५.

वॉटर सुव्हरेज

कलम १२९(ब)(ब) किमान,कमाल बंधन नाही

-

१.५%

२.५%

१.५%

२.५%

६.

फायर टॅक्स

कलम१२९(क)नुसार कलम ६३ खंड ५ मधील तरतुदीनुसार

२% पर्यंत

०.७५%

-

०.७५%

-

७.

म्युनसिपल शिक्षण से.स

से.स.कलम १४(अ) ५टक्के पर्यंत नुसार

५% पर्यंत

२.५०%

-

२.५०%

-

८.

पथकर कलम

१४८(क)नुसार कलम ६३ खंड १८ मधील तरतुदीसा़ठी

१०% पर्यंत

२%

-

२%

-

९.

ट्री से.सं

वृक्ष प्राधिकरण अधि नियमामधील तरतुदीप्रमाणे

१%

१%

-

१%

-

१०.

जाहिरात कर

कलम १४७(२)नुसार

शासनमान्यतेने जाहिरात कराचे नियम व दर महानगरपालिकेने मंजूर करून घेतले आहेत

११.

करमणूक कर

कलम १२७(ड)नुसार

शासनमान्यतेने जाहिरात कराचे नियम व दर महानगरपालिकेने मंजूर करून घेतले आहेत

१२.

कूञा कर

महानगरपालिकेच्या मान्यतेने

सन २०००-२००१ पासून पाळीव कुञ्यावर कर आकारला जातो. प्रतिवर्षी रू.२५ प्रमाणे व बिल्ला रू.१० प्रमाणे

१३.

वाहन कर

शहरातील भाडोञी सायकली, टांगा बैलगाडी, एक्कागाडी या वाहनांवर चाकपडी वाहन कर आकारला जातो

सायकल,
ढकलगाडी,
एक्का,
बैलगाडी,
टांगा.

वार्षिक
वार्षिक
वार्षिक

वार्षिक
वार्षिक

रु.३/-
रु.५/-
रु.६/-

रु.१०/-
रु.१०/-

                 

 

NA
माहिती लवकरच प्रदर्शित होईल