नागरिक सेवा
विवाह नोंदणी

:

:

:

:

विवाह नोंदणी विभागाची कामे

महाराष्ट्र विवाह मंडळाचे विनियमन आणि विवाह नोंदणी अधिनियम, १९९८ (सन १९९९ चा अधिनियम क्र. २०) नुसार शहरातील नागरिकांना विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे तसेच शहरातील विवाह मंडळांना नोंदणीकृत प्रमाणपत्र देणेचे काम विवाह नोंदणी कार्यालयमार्फत करणेत येते.

 

विवाह नोंदणीसाठी नियम

  • वराचे वय २१ वर्षे  व वधूचे वय १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक
  • फक्त कोल्हापूर महानगरपालिका शहर हद्दीतील रहिवासी असलेले वधू-वर यांनी मुंबई विवाह कायद्याखाली विवाह नोंदणी करण्यासाठी खाली नमूद केले कागदपत्रे मूळ प्रतीसह वधू – वर व तीन साक्षीदार यांनी कार्यालयात समक्ष हजर राहुन विवाह निबंधक यांचेसमोर फॉर्म ‘ड’ वर स्वाक्षरी करणे बंधनकारक आहे.
  • वधू –
    1. रहिवास पुरावा (माहेरकडील) (उदा. रेशनकार्ड, निवडणूक ओळखपत्र, आधार कार्ड, तहसीलदार यांचेकडून देणेत आलेला रहिवासी दाखला) यापैकी एक.
    2. वयाचा दाखला (उदा. जन्मदाखला, शाळा सोडल्याचा दाखला, बोनाफाईड प्रमाणपत्र, पासपोर्ट) यापैकी एक.
    3. फोटो ओळखपत्र (आयडी प्रुफ)
    4. आधारकार्ड

 

  • वर –
    1. रहिवास पुरावा (उदा. रेशनकार्ड, निवडणूक ओळखपत्र, आधार कार्ड, तहसीलदार यांचेकडून देणेत आलेला रहिवासी दाखला) यापैकी एक
    2. वयाचा दाखला (उदा. जन्मदाखला, शाळा सोडल्याचा दाखला, बोनाफाईड प्रमाणपत्र, पासपोर्ट) यापैकी एक.
    3. फोटो ओळखपत्र (आयडी प्रुफ)
    4. आधारकार्ड

 

  • लग्नपत्रिका किंवा लग्नपत्रिका नसलेस वधू-वर व तीन साक्षीदार यांनी तहसीलदार यांचेसमोर स्टँप पेपरवर विहित नमुन्यात  केलेले प्रतिज्ञापत्र व लग्नप्रसंगाचा एक फोटो
  • तीन साक्षीदाराचे प्रत्येकी फोटो, आधारकार्ड
  • पुरोहिताचे आधारकार्ड
  • वधू - वर – घटस्फोटीत असलेस मा. न्यायालयाचे आदेश व विधवा – विधुर असलेस / मयत दाखला
  • वधू – वर – अनिवासी भारतीय (NRI) असलेस पासपोर्ट, सोशल सिक्युरिटी नंबर/ आयडी कार्ड / लेबर कार्ड, इ. आवश्यक
  •  रु. १००/-  चे न्यायालयीन फी तिकीट
  •  सर्व कागदपत्रे सत्यप्रती (ट्रु कॉपी) करून जोडणे आवश्यक
NA
माहिती लवकरच प्रदर्शित होईल
विभागाची संरचना
माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये कलम 4 प्रमाणे प्रसिध्द करावयाची माहिती