नागरिक सेवा
प्राथमिक शिक्षण समिती

१९४० साली छत्रपती राजाराम महाराज यांचे निधनानंतर कोल्हापूर संस्थानचा कारभार कौन्सिलमार्फत चालू होता.या कौन्सिलचे रिजंट म्हणून महाराजांच्या थोरल्या राणीसाहेब ताराराणी या होत्या.छत्रपती शाहू महाराज यांनी केलेल्या शैक्षणिक कार्याचा वारसा पुढे चालू ठेवण्याच्या हेतुने कोल्हापूर नगरपालिकेने मागणी केल्यावरून कोल्हापूर शहरातील प्राथमिक शिक्षणाची सर्व व्यवस्था व जबाबदारी नगरपालिकेकडे दिनांक २४ सप्टेंबर १९४२ रोजी सुपूर्त करण्यात आली.त्यावेळच्या दरबारच्या १९४२ च्या प्राथमिक शिक्षणाच्या कायद्यानुसार दिनांक २१ डिसेंबर १९४२ रोजी शिक्षण समितीची स्थापना व निवड होऊन शहरातील प्राथमिक शिक्षण खात्याची सर्व व्यवस्था व जबाबदारी शिक्षण समितीकडे आली.यानंतर संस्था मुंबई इलाख्यात विलीन झाल्यावर मुंबई प्राथमिक शिक्षणाच्या १९४७ च्या कायद्यान्वये दिनांक १-६-१९४८ रोजी शिक्षण समितीचे रूपांतर म्यन्सिपल स्कूल बोर्डमध्ये झाले.

सुमारे ७०-८० वर्षापूर्वी ख-या अर्थाने कोल्हापूर संस्थानात छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी विद्येची कवाडे खोलली.बहुजन समाजाच्याच नव्हे तर सर्व जाती धर्माच्या लोकांना ज्ञानाची मुक्तहस्ते पाणपोई सुरू केली उदार अंतकरणाने अमाप पैसा खर्च केली त्यांच्याकरिता बोर्डिंग्ज बांधल्या.इतकेच नव्हे तर बोर्डिंग्जच्या खर्चासाठी देणग्या व कायमस्वरूपी जमिनी दिल्या आणि याचेच फलित म्हणजे आज हे कोल्हापूर कलेचे, शिक्षण क्रीडीक्षेत्राचे माहेरघर बनले आहे.कोल्हापूर शहर हे एक वैभवसंपन्न ,कलाप्रेमी,क्रिडाप्रेमी,उद्योगनिष्ठ.निर्सगसुशोभित शहर म्हणुन दक्षिण महाराष्ट्रात ओळखले जात आहे.

शासनाने १९६८ पासुन सुधारित अभ्यासक्रम लागू केला आहे.विशेषत इयत्ता ८ वी पासुन विज्ञान,गणित,इंग्रजी,या विषयांवर अधिक भर दिला आहे.शिक्षकांना अध्यापनात अभ्यासक्रमाचे ज्ञान होण्यासाठी दर वर्षी शासनामार्फत एस.एम.टी.टी.कॉलेज,डी.एड.कॉलेज, वत्सलादेवी ज्युनि.ट्रेनिंक कॉलेमध्ये सुरू असलेल्या सेवांतर्गत अल्प मुदतीचे प्रशिक्षण वर्ग सतत सुरू असतात.त्यामध्ये शिक्षकांच्या तुकड्या नियमितपणे पाठविल्या जातात.तसेच शिक्षणाधिकारी यांचेमार्फतही काही प्रशिक्षण वर्ग सुरू असतता.या शिक्षण मंडळामार्फत स्वतंत्र इंग्रजी,गणित,शास्त्र या विषयांचे अल्प मुदतीचे प्रायव्हेट हायस्कूल,महाराष्ट्र हायस्कूल,डी.एड.कॉलेज यांच्या सहकार्याने सुरू असतात.

इंग्रजी विषयासाठी इयत्ता ५ वी ते ७वी च्या शिक्षकासाठी खास शॉर्ट टर्म कोर्स चालु असतात.त्यामध्ये किमान २०० शिक्षक भाग घेतात. एन.सी.ई.आर.टी.योजनेनुसार प्रत्येक शाळेत प्रशिक्षित शिक्षकामार्फत शास्त्र विषयांचे शिक्षण सुरू आहे.यासाठी शासनामार्फत काही शाळांना अद्यावत साहित पुरविले आहे.या विषयांना अधिक चालना मिळावी म्हणून निरनिराळ्या भागात सुसजज अशा २५ शाळात विज्ञान प्रयोगशाळा सुरू करण्याची योजना सुरू आहे.त्यापैकी ७-८ शाळामध्ये अद्यावत साहित्यानिशी प्रयोगशाळा सुरू झाल्या आहेत.शास्त्र विषयाच्या अध्यापनासाठी इयत्ता ३री ते ७वी एन.सी.ई.आर.टी.अभ्यासक्रम पूर्ण केलेले किमान २०० शिक्षक या शिक्षण मंडळाकडे आहेत.

कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व भाग सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाच्या योजनेत आणला असून या भागात मोठ्या प्रमाणात शिक्षणाचा प्रसार व कार्य चालू आहे.सक्तीचे प्राथमिक शिक्षणाची वयोमर्यादा ६ते११ पर्यंत असून सक्तीचे प्राथमिक शिक्षण फक्त १ली ते ४थी पर्यंत आहे

माहिती लवकरच प्रदर्शित होईल
कोल्हापूर महानगरपालिका शाळांची यादी