नागरिक सेवा
जनसंपर्क कार्यालय

:

:

:

:

कोल्हापूर महानगरपालिका जनसंपर्क विभागाची कार्ये

  • महानगरपालिकामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती व महानगरपालिकेच्या अनेक विभागासंदर्भात दैनिकांमधून वस्तुस्थितीशी विसंगत किंवा विपर्यास असणाऱ्या बातम्यांचा खुलासा/स्पष्टीकरण संबंधित विभागाकडून  घेऊन दैनिकामध्ये प्रसिद्धीची कार्यवाही ठेवणे. महानगरपालिकेच्या सर्व कार्यक्रमांना फोटोसह प्रसिद्धीची कार्यवाही ठेवणे.
  • महानगरपालिकेकडे येणारी सर्व दैनिके (वृत्तपत्र) तपासून त्यामधून महानगरपालिके संदर्भातील बातम्या काढून वरिष्ठांचे निदर्शनास आणून संबंधित विभागाकडे पाठविणे. महानगरपालिकेच्या सर्व सभा, बैठका, इ. विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणे व त्याबाबतची बातमी सर्व वर्तमानपत्रांना पाठविणे. पत्रकार परिषदांचे आयोजन करणे. महानगरपालिकेच्यावतीने सर्व कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, रंकाळा महोत्सव, मानपत्र अर्पण सभारंभ, उद्घाटन समारंभ यांची निमंत्रण पत्रिका काढणे. जनसंपर्क विभागात माहिती घेण्यासाठी आलेल्या नागरिक, विद्यार्थी, पत्रकार यांना महानगरपालिके संदर्भातील माहिती देणे. जनसंपर्क विभागात येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारींचा पाठपुरावा करणे.
  • महानगरपालिकेच्या सर्व विभागाकडून येणाऱ्या जाहिराती/टेंडर नोटीस प्रसिद्धीसाठी दैनिकांकडे पाठविणे. महानगरपालिकेच्यावतीने देण्यात आलेल्या जाहिरातींचे बिले, व्हिडीओग्राफरचे बिले व फोटोची बिले अदा करणे.
  • महानगरपालिका लोकशाही दिनाचे संपूर्ण कामकाज पाहणे.
  • मा. मंत्री/खासदार/आमदार यांचेकडून आलेले पत्रव्यवहाराची संबंधित विभागाकडून आढावा घेणे.
  • कोल्हापूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन एअर रायफल ट्रेनिंग सेंटरचे संपूर्ण कामकाज पाहणे.
  • शहरातील नागरिकांसाठी टोल फिर क्रमांक १८००२३३१९१३ वरून येणाऱ्या किरकोळ तक्रारींची नोंद करून संबंधित विभागाकडे पाठवून त्याची पूर्तता करणे.

 

NA
माहिती लवकरच प्रदर्शित होईल
माहिती लवकरच प्रदर्शित होईल