नागरिक सेवा
भविष्य निर्वाह निधी/पेंशन विभाग

:

:

:

:

पेन्शन व प्रोव्हिडंट फंड विभागा अंतर्गत कामकाजाबाबत माहिती

  • महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतन) नियम 1982 मधील तरतुदीनुसार कोल्हापूर महापालिकेकडील निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्ती वेतन धारक यांना निवृत्ती वेतन व सेवा उपदान रक्कम अदा करणेत येते.
  • महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी अधिनियम 1998 मधील तरतुदीनुसार कार्यरत कर्मचारी यांना प्रॉव्हीडंट फंड अग्रीम व सेवानिवृत्त कर्मचारी यांना प्रॉव्हीडंट फंड रक्कम अदा करण्यात येते.
  • महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतनाचे अंशराशीकरण) नियम 1984 मधील तरतुदीनुसार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना अंशराशीकरण रक्कम अदा करण्यात येते.
  • जे अधिकारी व कर्मचारी 1 नोव्हेंबर 2005 इ. रोजी किंवा त्यानंतर सेवेत रूजू झाले आहेत त्यांना सदयस्थितीमध्ये सीपीएफ रक्कम अदा करण्यात येते.
  • महाराष्ट्र शासन वित्त विभाग व नगरविकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडून वेळोवेळी पारित होणारे शासन निर्णय व परिपत्रके यानुसार निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्ती वेतन धारक यांचे पेन्शन विषयक बाबींची पूर्तता ठेवणेत येते. आणि कार्यरत कर्मचारी यांचे प्रॉव्हीडंट फंड व सीपीएफ रक्कम बाबत कार्यवाही ठेवण्यात येते.
  • कोल्हापूर महानगरपालिकेकडील जे अधिकारी/कर्मचारी सेवानिवृत्त किंवा दिवंगत होतात त्यांचे निवृत्तीवेतन महाराष्ट्र नागरीसेवा (निवृत्ती वेतन) नियम 1982  महाराष्ट्र शासन, वित्त विभाग, मंत्रालय, मंबई400 032 यांचेकडून वेळोवेळी पारित होणारे शासन निर्णय/परिपत्रक मधिल तरतूदीनुसार आदा करणेत येते.
  • पेन्शन विभागकडे निवृत्ती वेतनधारक 2039  कुटुंब निवृत्ती वेतनधारक 1316 असे एकूण निवृत्तीवेतनधारक 3355 आहेत. सदर पेन्शनधारक यांचे दरमहा पेन्शन आदा करणेत येते. सदरची पेन्शन कोल्हापूर आर्बन को-ऑप. बँक, अपना सहकारी बँक,  आय.डी.बी.आय. बँक यांचे विविध शाखामध्ये आदा करणेत येते. 
  • अधिकारी/कर्मचारी सेवानिवृत्त किंवा दिवंगत झालेनंतर त्यांचे पेन्शन प्रकरण कोमनपा आस्थापना विभाग यांचेमार्फत तयार करुन पेन्शन विभागाकडे प्राप्त होते. ज्या महिन्यात पेन्शन प्रकण प्राप्त होते, त्या महिन्यामध्ये संबंधितांना पेन्शन आदा करणेत येते. तदनंतर त्यांना पेन्शन फरक  सेवाउपदान रक्क्म आदा करणेत येते. एखादा पेन्शनर दिवंगत झालेस त्यांचे कुटुंब निवृत्तीवेतन प्रकरण पेन्शन विभागाकडून करणेत येते.
  • भविष्य निर्वाह निधी नियम 1998 अंतर्गत ज्या अधिकारी/कर्मचारी यांची वर्गणी कपात होत आहे, त्यांची संख्या 947 आहे. संबंधितांची वर्गणी आस्थापना विभागाकडून कपात करणेत येते. दरमहा वर्गणी रुपये 33.49 लाख संकलित होते. उपरोक्त अधिनियमामधील तरतूदीनुसार संबंधितांना कर्ज आदा करणेत येते. सदर कर्जाचे वसुली 20/36 महिन्याचे समान हप्त्यामध्ये करणेत येते. अधिकारी/कर्मचारी सेवानिवृत्त किंवा दिवंगत झालेस त्यांना/वारसांना मा.सहा. आयुक्त, को.म.न.पा. यांचे मान्यतेअंति त्यांची संचित रक्कम आदा करणेत येते.
  • जे अधिकारी/कर्मचारी कोल्हापूर महानगरपालिका सेवेत दिनांक 01 नोव्हेंबर, 2005 किंवा तदनंतर नियुक्त झालेले आहेत. अशा अधिकारी/कर्मचारी यांना महाराष्ट्र शासन, वित्त विभाग, शासन निर्णय क्र.अनियो 1009/प्र.क्र.1/सेवा मंत्रालय, मुंबई400 032 मध्ये तरतूदीनुसार परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना अंतर्गत लाभ देणेत येतो. 
  • भाविष्य निर्वाह निधी  नविन परिभाषित अंशदान योजना मधिल वर्गणीदार यांना महाराष्ट्र शासन, वित्त विभाग, मंत्रालय, मंबई400 032 यांचेकडून वेळोवेळी पारित होणारे शासन निर्णय/परिपत्रक मधिल तरतूदीनुसार दरमहा व्याजदर आदा करणेत येते.

 

NA
माहिती लवकरच प्रदर्शित होईल
विभागाची संरचना