नागरिक सेवा
अग्निशमन विभाग

पदनाम :

मुख्य अग्निशमन अधिकारी

नाव:

मनिष प्र रणभिसे

ईमेल:

मोबाइल :

+91 - 9766532020

कोल्हापूर महानगरपालिकाकडील अग्निशमन केंद्रे

अ.क्र.

फायर स्टेशन

पत्ता

  1.  

स्टेशन क्रमांक 1 ताराराणी फायर स्टेशन

निवडणुक कार्यालय,

सासने मैदान,कोल्हापूर

  1.  

स्टेशन क्रमांक 2. लक्ष्मीपुरी फायर स्टेशन 

लक्ष्मीपुरी, कोल्हापूर

  1.  

स्टेशन क्रमांक 3. कै. दत्तात्रय खामकर फायर
स्टेशन

कसबा बावडा, कोल्हापूर

  1.  

स्टेशन क्रमांक-  4 कै. अशोक माने फायर स्टेशन

बी वॉर्ड, टिंबर मार्केट, कोल्हापूर

  1.  

स्टेशन क्रमांक-  5 फुलेवाडी फायर स्टेशन

ए वॉर्ड, फुलेवाडी, कोल्हापूर

  1.  

स्टेशन क्रमांक-  6 प्रतिभानगर फायर स्टेशन 

  वॉर्ड, शास्त्रीनगर, कोल्हापूर

 

 

 

कोल्हापूर  शहरातील विविध व्यवसाय,उद्योग यांना लावणेत आलेलेली अग्निशमन शुल्क

  • कोल्हापूर  महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे वतीने शहरात शहराबाहेर विविध प्रकारची सेवा देणेत येते तसेच शहरांतर्गत विविध उद्योग, व्यवसाय, हॉटेल, हॉस्पीटल, चित्रपटगृहे, कारखाने, इतर सेवा यांची तपासणी करुन त्यांना ना-हरकत दाखला देणेत येतो. याकरीता संबंधीत व्यवसायधारक यांचे कडून मुंबई महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलम 99 कलम 386 (2) तसेच कोल्हापूर महानगरपालिका मा. प्रशासकीय दफ्तरी ठराव क्र. 40 दि. 17/2/2021 ने  फी भाडे निश्चित केले आहेत.

 

इमारतीच्या बांधकामास आकारणेत येणारी अग्निशमन सेवा फी

  • महाराष्ट्र आग प्रतिबंधक आणि जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम 2006 भाग 4 मधील प्रकरण चार कलम 11 मधील पोटकलम 1,2,3,4,5 (अनुसुची दोन) नुसार तसेच को.म.न.पा. महासभा ठराव क्र. 141 दि. 16/04/2013 पासुन अग्निशमन सेवा फी आकारण्यात येत आहे.
  • महाराष्ट्र आग प्रतिबंधक आणि जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम 2006 भाग 4 मधील प्रकरण सात कलम 25 पोटकलम 1,2,3 नुसार आग सुरक्षा निधी या नावाने संबोधला जाणारा एक विषेश निधी स्थापन करण्यात आला असुन या अधिनियमान्वये बसवण्यात गोळा करण्यात आलेली फी यामध्ये जमा केली जाते.
  • या निधीचा उपयोग अग्निशमन पथकसेवा चालवण्यासाठी तसेच कर्मचारी यांचे वेतन,भत्ते, साधन सामुग्री आणि इतर अनुषंगिक बाबीसाठी खर्च केला जातो.

 

अग्निशमन विभागाकडील विविध कार्ये

  • अग्निशमन विभागाचा शहराकरीता मिटीकेशन प्लॅन तयार करणेत आला आहे. यामध्ये शहरात आणखी 3 ठिकाणी फायर स्टेशन स्थापन करणेकामी जागेचे आरक्षण करणेकरीता प्रस्तावीत केले आहे.
  • 14 एप्रिल ते 20 एप्रिल रोजी शहरात अग्नि सुरक्षा सप्ताह साजरा करणेत येतो. या वेळी शहरातील विविध भागातून प्रबोधन रॅली काढणेत येते. तसेच शहारात विविध भागात आग प्रतिबंध जीव सुरक्षा याबाबत प्रात्यक्षिके दाखविणेत येतात.

 

कोल्हापूर शहर आपत्ती व्यवस्थापन 

कोल्हापूर शहर पंचगंगा नदीच्या तिरावर बसलेले आहे.सन 2011 च्या जनगणने नुसार कोल्हापूर शहराची लोकसंख्या 5.5 लक्ष पेक्षा जास्त झाली आहे.

          आपत्तीचा इतिहास बघता शहराला पूर या आपत्तीचा सामना करावा लागला आहे. सन 1989, 2005, 2019, 2021 मध्ये कोल्हापूर जिल्हया बरोबरच शहराला पूराचा तडाखा बसला होता. यामध्ये सुतारवाडा, शाहुपूरी कंुभार गल्ली, सिता कॉलनी, रमनमळा, उलपे मळा, कदमवाडी, जाधववाडी अशा ठिकाणी पंचगंगा नदीचे पुराचे पाणी येते. यावेळी तेथील रहीवाश्यांना सुरक्षीत ठिकाणी स्तलांतरीत करावे लागते त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा-2005 मधील मार्गदर्शक सूचना नुसार दर वर्षी कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रमाणित कृती प्रक्रिया आराखाडा तयार करण्यात येतो.

माहिती लवकरच प्रदर्शित होईल