कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत परवाना विभागामार्फत शहरातील विविध आस्थापनांना (अन्न व खाद्यपदार्थ विषयक व्यवसाय वगळून) परवाना देणेचे काम करणेत येते. परवाना विभागामार्फत नागरिकांना खालीलप्रमाणे विविध प्रकारच्या सेवा देण्यात येतात.
- नवीन परवाना देणे
- परवाना नूतनीकरण करणे
- परवाना हस्तांतर करणे
- परवाना दुय्यमप्रत उपलब्ध करून देणे
- व्यवसायाचे नाव बदलणे
- भागीदारांचे नाव बदलणे
- भागीदार संख्या वाढ/कमी करणे
- परवाने रद्द करणे
राज्यशासनाचे धोरणानुसार सेवा हमी कायद्याने सदर चे काम करण्याकरिता विहित मुदत १५ दिवस इतकी दिलेली आहे.
नवीन परवाना करिता आवश्यक कागदपत्रे
- प्रॉपर्टी कार्ड / सातबारा उतारा
- बांधकाम परवानगी प्रमाणपत्र
- मंजूर नकाशा
- भोगवटा प्रमाणपत्र
- घरफाळा भरलेली पावती
- गुमास्ता परवाना नोंद
- जागा मालक संमती पत्र
- इमारत फोटो
- इमारत जुनी असलेस व बांधकाम परवानगी, भोगवटा प्रमाणपत्र नसलेस असेसमेंट उतारा सन १९८७/८८
परवाना विभागाकडील कामकाजाची विधीग्राह्यता
- महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम - ३१३ - मा. आयुक्तांचे परवानगीशिवाय कारखाना, इत्यादी नव्याने स्थापन करता येत नाही.
- कलम -३७६ - लायसन्सशिवाय विवक्षित गोष्टी न ठेवणे आणि विवक्षित व्यवसाय व कामे न करणे.
- कलम -३७६ अ - एखाद्या जागेचा वापर करणे हे घातक किंवा उपद्रवकारक असेल तेव्हा असा वापर थांबविण्याचा अधिकार
- कलम ३८६ - लायसन्स व लेखी परवानगी देणे, निलंबन करणे किंवा रद्द करणे आणि फी इद्यादी बसविणे यासंबंधी सर्वसाधारण तरतुदी.
- कलम ४५८ (२०) खाली तयार करणेत आलेले उपविधी.
परवाना देणेकामी अनुज्ञेय व्यवसाय
- महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रकरण १८ मधील यादी व महानगरपालिकेने मंजूर केलेले व्यवसाय (अन्न पदार्थ निर्मिती व विक्री वगळून)